शिवनेरी किल्ल्यावरील बुद्ध लेणी छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा. पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात. आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या लेणीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातुन शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खुप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात.लेणी वर जाण्यासाठी खाली साखळदंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत.साधारणता १ तासाची चढाई केल्यावर आपण साखळदंड आहे त्याठीकाणी येउन पोहचतो. त्या इथे एक मोठा लेणी समुह आपल्याला पहायला मिळतो. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याच प्रमाने या लेणीच्या समोरच पाण्याची टाकी आहे.उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यां मधे मुबलक प्रमाणात पाणी ...