Skip to main content

शिवनेरी बुद्ध लेणी

शिवनेरी किल्ल्यावरील बुद्ध लेणी

छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा.
पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात.
आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या लेणीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातुन शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खुप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात.लेणी वर जाण्यासाठी खाली साखळदंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत.साधारणता १ तासाची चढाई केल्यावर आपण साखळदंड आहे त्याठीकाणी येउन पोहचतो. त्या इथे एक मोठा लेणी समुह आपल्याला पहायला मिळतो. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याच प्रमाने या लेणीच्या समोरच पाण्याची टाकी आहे.उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यां मधे मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे यावरून आपण त्याकाळातील जलव्यवस्थापन हे किती उत्तम होते याची जाणीव होते.या टाकी जवलच एक सुंदर लेण आहे,लेणी द्वारा वर सुंदर असे नक्षी काम कोरलेले आहे
आत मधे बौद्ध भिक्खुंसाठी साधना करण्या साठी शैलगृह आहेत. लेणी द्वाराच्या बाजुला अप्रतिम अशी खिड़की कोरलेली आहे. बेडसे लेणी मध्ये पण आपल्याला सुंदर खिड़की पहायला भेटते. या लेणी समुहातिल बहुतेक लेणी या अर्धवट कोरलेल्या दिसतात. या लेणीच्या खालच्या बाजुने पुढे पायवाटेने १५ मिनट चालत गेल्यावर  दुसरा एक मोठा लेणी समुह बघन्यास मिळतो.या लेणी मधे एक मोठे चैत्यगृह कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या प्रवेश भिंतीवर दोन्ही बाजुला खिडक्या कोरलेल्या आहेत. तसेच प्रवेश द्वाराच्या इथे पायऱ्या सुद्धा आहेत. या लेणीच्या उजव्या बाजुच्या भिंतीवर एक पाली भाषेतील ब्राम्ही लिपितिल शिलालेख कोरलेला आहे.या लेणी साठी कोणी दान दिले याचा उल्लेख त्यात आहे. लेणी प्रवेशद्वारा समोरच्या छताला दोन हजार वर्षां पुर्वीचे रंगकाम केलेले आढळते.आज ते रंगकाम शेवटची घटका मोजत आहेत परंतु जेवढे शिल्लक आहे ते ज्या वेळेस आपण पाहतो तर असे वाटते की आताच कोणि तरी काचेवर रंग काम केले आहे एवढी चकाकी आजही त्या कलेत दिसते. विचार मनात येतो की ज्या वेळेस ते रंगकाम केले गेले असेल त्याचे सौंदर्य किती अप्रतिम असेल.चैत्यगृहा मधे प्रवेश केल्यावर चार खांब दिसतात. आत मधे एक भव्य असा परिपुर्ण चैत्यस्तुप दिसतो,हे चैत्यगृह चौकोनी आहे. याच्या छतालाही रंगकाम केलेले होते,आज त्यातील थोडेच रंगकाम शिल्लक आहे.याची चकाकी सुद्धा अप्रतिम आहे. स्तुपाचा आकार हा खुप भव्य आहे. या स्तुपाला हर्मिका आणि दगडात कोरलेली छत्री सुद्धा आहे की जी छताला जोड़लेली आहे.या स्तुपाची पुजा जेव्हा बौद्ध भीक्खु आणि उपासक करत असतील तेव्हा येथील वातावरण खुप धम्ममय होत असेल यात शंका नाही. बुद्ध स्तुपाच्या सानिध्यात एक विलक्षण शांती अनुभवयास मिळते.या चैत्यगृहा समोर पाहिले असता विस्तीर्ण असा जुन्नरचा परिसर दृष्टीक्षेपात पडतो.अंबा अंबिका लेणी समुह सुद्धा याठीकाना वरून दिसतो.
वंदामी चेतियं सब्ब सब्ब ठानेसु पतीठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकल सदा.
हे चैत्य स्तुपाचे सुर हजारो वर्ष या लेणींमधुन दुमदुमत असतील आणि संपुर्ण भुतलावरील प्राणी हर्षाने उल्हासित होत असतील यात तीळ मात्र शंका नाही.

या चैत्यगृहाच्या बाजुला शैलगृह कोरलेले आहेत.यात दर्शनी भिंतीवर स्तुप कोरलेला आहे याच्या छतालाही रंगकाम केलेल्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात. या लेणीच्या बाजुला काही पायऱ्या कोरलेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात ज्या प्रमाणे एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्या साठी जीना असतो त्याच प्रमाणे एक जीना कोरलेला दिसतो या जिन्यातुन वरती गेल्यावर आपल्याला एक भव्य लेणी दिसते या लेणीला व्हरंडा आहे दुमजली असलेल्या या लेणी मधुन समोरचे दृश्य अप्रतिम दिसते.
सम्राट अशोक यांनी बुद्ध अस्थि धातुंवर संपुर्ण जंबुद्वीपात ८४००० स्तुप बांधले.स्तुप हे बुद्ध प्रतीक आहे. बुद्ध प्रतीक पुढील प्रमाने होत बोधिवृक्ष,सिरिपाद,स्तुप. बोधिवृक्ष आपल्याला अंबाअंबिका लेणी समुहातिल भुत लेणीच्या प्रवेशद्वारा वर कोरलेले दिसते,तसेच बुद्ध,धम्म,संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा भुत लेणी मध्ये, अंबा अंबिका लेणी मधे कोरलेल्या शिलालेखाच्या सुरुवातीला तसेच लेन्याद्रिच्या मुख्य स्तुपाच्या हर्मिकेवर कोरलेले आपल्याला पहायला भेटते. एवढ्या विपुल प्रमाणात जुन्नर मधे लेणी आहेत की यावरून आपन हा अनुमान लावतो की दोन हजार वर्षांपुर्वी किती विपुल प्रमाणात भिक्खु संघ येथे वास्तव्य करत असेल आणि त्यांना दान देणारे उपासकही येथे मोठ्या प्रमाणात असतील.
संपुर्ण जंबुद्वीपावर बुद्धांच्या धम्माचे राज होते हे आपल्याला ठाउक आहे.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
हा ध्वनि हजारो वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात दुमदुमत असेल. लाखो अनुयायी बुद्धाने सांगितलेल्या धम्म मार्गावर आपले जीवन व्यतीत करत आले आहेत.
हा बुद्धांचा धम्म जनमाणसा पर्यंत पोहचवन्याचे प्रमुख केंद्र या लेणी होत्या. हजारो वर्षां पासुन या बुद्धाच्या भारत भुमिला भेट देण्यासाठी अनेक राजे,उपासक येत होते,येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील.

अशी ही अप्रतिम जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरील लेणी पाहण्यासाठी माझ्या सोबत माझे जवळचे मित्र डॉ.संदिप रोहकले,संदिप लेंडे आणि निखिल बारभाई उपस्थित होते.आपणही जुन्नरला शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी कधी आलात तर या लेणीला आवश्य भेट द्या.
सिद्धार्थ कसबे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दक्षिणेतील बौद्ध धर्म.कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गाचा मी नेहमी उल्लेख करत असतो.नालासोपाऱ्या पासुन सुरु होणार हा दोन हजार वर्षांपूर्वीचा मार्ग आपल्या नाणेघाट-जुन्नर येथून पैठणला जातो पुढे तो दक्षिणेत कसा जातो व या दक्षिण भागात बौद्ध धर्म कशा प्रकारे प्रस्थापित झालेला होता.येथील बौद्ध मठ,स्तुप,शिल्पपट कोणत्या प्रकारचे होते हे आपण या पुढे पाहणार आहोत.दक्षिणापथा वरील बौद्ध धर्म.

१)रामग्राम स्तुप धुलिकट्टा स्तूप,करीमनगर जिल्हा, तेलंगणा. सातवाहन साम्राज्य,इसविसन पुर्व पहिले शतक. धुलिकट्टा स्तूपातील या  पॅनेलमध्ये दोन उपासक धर्मचक्राची  पूजा करताना दिसत आहेत.ते धर्मचक्र एका स्तंभावर आरोहित, हे दृश्य बुद्धाच्या भौतिक अवशेषांच्या (शरिराधातु) आठव्या भागाचे पूजन म्हणून देखील पाहता येईल. बुद्धाच्या महापरीनिर्वाणा नंतर लगेचच अस्थी धातूंच्या अवशेषांचे आठ भागात विभाजन करण्यात आलेले होते. हा भाग रामग्राम स्तूपामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला होता.   महापरिनिर्वाण-सूत्रानुसार संबंधित आख्यायिका सांगते की, नदीकाठच्या जवळ बांधलेला स्तूप नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला, तेव्हा ते अवशेष तेथे राहणाऱ्या नागांच्या ताब्यात आले. त्यांनी अवशेषाचा योग्य सन्मान केला आणि तो सम्राट अशोकाला आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. ही कथा आंध्रदेशाच्या सुरुवातीच्या शिल्पकलेत  मोठ्या प्रमाणावर चित्रित केली गेली आहे आणि अशोकवदनामध्ये, अशोकाच्या चरित्रात दुस-या शतकात लिहिलेली आहे. श्रीलंकेच्या राजाच्या वतीने हे अवशेष नागांकडून चोरले गेले आणि अनुराधापुरा येथील रुवानवली...

राजकुमार सिद्धार्थ चुडामहा पुजन,फनीगिरी,सुर्यापेठ जिल्हा तेलंगणा.गौतम बुद्धांच्या अवशेषां पैकी एक महत्वाचे अवशेष त्यांचा मुकुट व केस.

राजकुमार सिद्धार्थ चुडामहा पुजन,फनीगिरी,सुर्यापेठ जिल्हा तेलंगणा. गौतम बुद्धांच्या अवशेषां पैकी एक महत्वाचे अवशेष  त्यांचा मुकुट व केस. बौद्ध साहित्यातील महावस्तु,ललितविस्तार,बुद्धचरित आणि निदानकथा यात हि कथा प्रसिद्ध आहे.यात थोडक्यात ते सांगतात की राजकुमार सिद्धार्थ याने गृहत्याग केल्या नंतर त्याच्या जवळ असलेल्या तलवारीने आपले केस कापल्या नंतर ते तावतीम्सा स्वर्गात नेण्यात आले  होते.तिथे देवांचा प्रमुख सक्क(इंद्र)याने ते स्वीकारून देवांच्या मंदिरात प्रतिष्ठित केले होते. अश्वघोष यांनी त्यांच्या बुद्ध चरित्रात याबाबतीत पुढील पंक्ती लिहिल्या आहेत. ' कमळाच्या पाकळ्या सारखी गडद तलवार म्यान करत त्याने केसांसह आपले अलंकृत शिरोभूषण कापले आणि हवेत फेकले,त्याचे कापड मागे पडले ते चित्र असे दिसत होते की जनुकाय तो हंस तलावात फेकतो आहे. जसे ते वर फेकले गेले तसे स्वर्गीय प्राण्यांनी ये पकडले व श्रद्धेने त्याची पूजा केली स्वर्गातील देवतांनी दैवी सन्मानासह आदरांजली वाहिली." वरील शिल्पपट हे तेलंगणा राज्यातील फनीगिरी या ठिकाणी २००३ साली उत्खनन करताना भेटलेले असुन ते ईश्वाकु या सत्ता...