Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

शिवनेरी लेणी

शिवनेरी किल्ल्यावरील अपरिचित लेणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी असल्याचे मी तुम्हाला सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही.परंतु मित्रांनो हे खरे आहे या किल्ल्यावर अंदाजे ८० लेणी असुन त्या सर्व बौद्ध लेण्या आहेत. त्यापैकीच काही अपरिचित लेण्यांची माहिती मी तुम्हाला आज येथे देणार आहे.  कुतूहलाची बाब म्हणजे  ब्रिटिश व दक्षिणेतील एक प्रसिद्ध पुरातत्वज्ञ यांनी या लेण्यांचा ज्यावेळेस सर्वे केला असेल त्यानंतर याठिकाणी कोणीही पाय ठेवला नसेल अपवाद काही अभ्यासक असतीलही. या लेण्या आहेत किल्ल्याच्या दक्षिण दिशेला. काही लेण्या किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी जवळ असूनही झाडी जास्त असल्याने समजुन येत नाहीत.  सध्या जंगलात पानगळ सुरु असल्याने जमिनीवर पानांचा खच  पसरलेला असतो, आकाशात सुर्य तळपत असतो आणि मी लेण्यांकडे जाण्यासाठी त्यातुन मार्ग काढत असतो. वाटेत काटेसावर फुललेला दिसल्यावर मनात येत यशाचा मार्ग हा ...