Skip to main content

शिवनेरी लेणी

शिवनेरी किल्ल्यावरील अपरिचित लेणी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे.
याच शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी असल्याचे मी तुम्हाला सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही.परंतु मित्रांनो हे खरे आहे या किल्ल्यावर अंदाजे ८० लेणी असुन त्या सर्व बौद्ध लेण्या आहेत. त्यापैकीच काही अपरिचित लेण्यांची माहिती मी तुम्हाला आज येथे देणार आहे.
 कुतूहलाची बाब म्हणजे  ब्रिटिश व दक्षिणेतील एक प्रसिद्ध पुरातत्वज्ञ यांनी या लेण्यांचा ज्यावेळेस सर्वे केला असेल त्यानंतर याठिकाणी कोणीही पाय ठेवला नसेल अपवाद काही अभ्यासक असतीलही.
या लेण्या आहेत किल्ल्याच्या दक्षिण दिशेला.
काही लेण्या किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी जवळ असूनही झाडी जास्त असल्याने समजुन येत नाहीत.
 सध्या जंगलात पानगळ सुरु असल्याने जमिनीवर पानांचा खच  पसरलेला असतो, आकाशात सुर्य तळपत असतो आणि मी लेण्यांकडे जाण्यासाठी त्यातुन मार्ग काढत असतो. वाटेत काटेसावर फुललेला दिसल्यावर मनात येत यशाचा मार्ग हा काटेरी असतो कारण या झाडावर फक्त काटे असतात व लाल रंगांची फुल.. या काटेसावरच्या फुलांप्रमाणेच या लेण्या सुद्धा येथील जंगलाच सौंदर्य वाढवत आहेत.
सध्या या लेण्या अनेक वन्य पशु पक्षांचे निवासस्थान झालेल्या आहेत. 
या लेण्यांच जर वैशिष्टय सांगता आलं तर याठिकाणी भरपूर प्रमाणात   पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत व आजही त्यात मुबलक प्रमाणात पाणी असुन वन्यजीव त्यातील पाण्याने त्यांची तहान गेली दोन हजार वर्षे भागवत आहेत.
तसेच काही ठिकाणी चैत्यगृह असुन बाकीच्या सर्व लेण्या या भीखु संघाची विहारे आहेत.लेण्यांना दरवाजे असुन खिडक्याही सुंदर कोरलेल्या आहेत.तसेच भीखुंच्या ध्यानासाठी दगडी बाकही त्यात कोरलेले असुन भिंतीवर स्तुपहि आहेत. सध्या या लेण्यांत वन्य पशु पक्षांचा अधिवास असुन त्यांच्याशिवाय  इतर कोणीही याठिकाणी फिरकत नाही.
या लेण्यांकडे जाण्याचे मार्ग हे अंत्यत बिकट असुन साधी पायवाटहि आपल्याला दिसत नाही.
यातील काही लेण्यांची छायाचित्र याठिकाणी देत आहे आपल्यापैकी कोणी याठिकाणी गेले असल्यास त्यांचे सर्वांचे अभिनंदन.
 कातळात कोरलेल्या या लेण्या बुद्धांचा इतिहास सांगण्याचं काम आजही आपल्याला करत आहेत.
त्याचप्रमाणे दोन हजार वर्षांपुर्वी बलाढ्य समजले जाणारे ग्रीक लोकही याठिकाणी येऊन या लेण्या कोरण्यासाठी दान देत होते हे येथील शिलालेखातून आपल्याला समजते.
त्यावेळीही याठिकाणी घनदाट जंगल असेल परंतु तेथे जाण्याचा मार्ग हा व्यवस्थित असेल अगदी राजा पासुन सामान्य माणूसही  त्याठिकाणी जाऊन भिक्षुंच्या वाणीतून बुद्धांचा धम्म ऐकत असतील. 

सिद्धार्थ कसबे.

Comments

Popular posts from this blog

शिवनेरी बुद्ध लेणी

शिवनेरी किल्ल्यावरील बुद्ध लेणी छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा. पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात. आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या लेणीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातुन शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खुप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात.लेणी वर जाण्यासाठी खाली साखळदंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत.साधारणता १ तासाची चढाई केल्यावर आपण साखळदंड आहे त्याठीकाणी येउन पोहचतो. त्या इथे एक मोठा लेणी समुह आपल्याला पहायला मिळतो. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याच प्रमाने या लेणीच्या समोरच पाण्याची टाकी आहे.उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यां मधे मुबलक प्रमाणात पाणी ...

Kanheri Buddhist caves

कान्हेरी लेणी अभ्यास दौरा. ************************ बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्ध कालीन इतीहासची आठवण करुण देणारे  जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी. सम्राट अशोकांचे ...

सातवाहन कालीन नानेघाट

दोन हजार वर्षां पुर्वीचा सातवाहन कालीन कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावरील नानेघाट महाराष्ट्रातील ऐतिहासिक दृष्टया संपन्न असलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक...