दक्षिणेतील बौद्ध धर्म.कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गाचा मी नेहमी उल्लेख करत असतो.नालासोपाऱ्या पासुन सुरु होणार हा दोन हजार वर्षांपूर्वीचा मार्ग आपल्या नाणेघाट-जुन्नर येथून पैठणला जातो पुढे तो दक्षिणेत कसा जातो व या दक्षिण भागात बौद्ध धर्म कशा प्रकारे प्रस्थापित झालेला होता.येथील बौद्ध मठ,स्तुप,शिल्पपट कोणत्या प्रकारचे होते हे आपण या पुढे पाहणार आहोत.दक्षिणापथा वरील बौद्ध धर्म.
१)रामग्राम स्तुप
धुलिकट्टा स्तूप,करीमनगर जिल्हा, तेलंगणा.
सातवाहन साम्राज्य,इसविसन पुर्व पहिले शतक.
धुलिकट्टा स्तूपातील या पॅनेलमध्ये दोन उपासक धर्मचक्राची पूजा करताना दिसत आहेत.ते धर्मचक्र एका स्तंभावर आरोहित, हे दृश्य बुद्धाच्या भौतिक अवशेषांच्या (शरिराधातु) आठव्या भागाचे पूजन म्हणून देखील पाहता येईल. बुद्धाच्या महापरीनिर्वाणा नंतर लगेचच अस्थी धातूंच्या अवशेषांचे आठ भागात विभाजन करण्यात आलेले होते. हा भाग रामग्राम स्तूपामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला होता. महापरिनिर्वाण-सूत्रानुसार संबंधित आख्यायिका सांगते की, नदीकाठच्या जवळ बांधलेला स्तूप नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला, तेव्हा ते अवशेष तेथे राहणाऱ्या नागांच्या ताब्यात आले. त्यांनी अवशेषाचा योग्य सन्मान केला आणि तो सम्राट अशोकाला आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. ही कथा आंध्रदेशाच्या सुरुवातीच्या शिल्पकलेत मोठ्या प्रमाणावर चित्रित केली गेली आहे आणि अशोकवदनामध्ये, अशोकाच्या चरित्रात दुस-या शतकात लिहिलेली आहे. श्रीलंकेच्या राजाच्या वतीने हे अवशेष नागांकडून चोरले गेले आणि अनुराधापुरा येथील रुवानवली स्तूपामध्ये विशिष्टपणे जमा केले गेले असे सांगून श्रीलंकेचा महावंश पर्यायी शेवट प्रदान करतो. या आख्यायिकेचे प्रतिनिधित्व, या वरील चित्रा मध्ये नागांनी स्तूपाच्या घुमटाभोवती(अंड) संरक्षणात्मकपणे त्यांचे शरीर गुंफलेले आपल्याला दिसते. दख्खनच्या सुरुवातीच्या काळात बौद्ध धर्मात ही एक प्रचलित कथा होती, क्वचितच उत्तर किंवा वायव्य भागात चित्रित केली गेली.या रामग्राम स्तूपाची लोकप्रियता लवकरच कमी झाली आणि दुसऱ्या शतकाच्या अखेरीस ती दख्खन परदेशातून एक प्रकारे नाहीशी झाली.या नंतरच्या काळात आपल्याला रामग्राम स्तूपाचे चित्रण या आपल्या दख्खन प्रदेशात कोठेही आढळुन येत नाही.
हा स्तूप साधा आणि अलंकृत आहे.स्तूपाच्या मधल्या भागात वेयिका पट्टीच्या खाली तीन अलंकृत केलेले सिंह स्तंभ दिसत आहेत.ते कमळाच्या फुलांनी सजविलेले आहेत.स्तूपाच्या घुमटाला चार नागांनी घेरलेले असुन तीन फन प्रत्येक नागाच्या डोक्यावर आपणास पहायला मिळते.जसे काय ते मानवा प्रमाणे हात जोडुन स्तुपाला वंदन करत असल्याचे दिसते. ते एकाच वेळी आतील बुद्धधातूंची(अवशेषांची) पूजा करतात आणि त्यांचे संरक्षण देखील करतात.
स्तूपाच्या मेधीवर मध्यभागी एक स्तंभ कोरलेला असुन त्याच्या खाली व वर दोन्ही ठिकाणी सिंह कोरण्यात आलेले आहेत.तसेच वरती धर्मचक्र ठेवण्यात आलेले आपणास दिसते.या धर्मचक्राला वंदन करताना दोन उपासक कोरलेले आहेत.तसेच स्तुपा पॅनल हा दोन्ही बाजूने अलंकारीत केलेला आपणास दिसुन येतो.
सिद्धार्थ कसबे.
Comments
Post a Comment