राजकुमार सिद्धार्थ चुडामहा पुजन,फनीगिरी,सुर्यापेठ जिल्हा तेलंगणा.गौतम बुद्धांच्या अवशेषां पैकी एक महत्वाचे अवशेष त्यांचा मुकुट व केस.
राजकुमार सिद्धार्थ चुडामहा पुजन,फनीगिरी,सुर्यापेठ जिल्हा तेलंगणा.
गौतम बुद्धांच्या अवशेषां पैकी एक महत्वाचे अवशेष त्यांचा मुकुट व केस.
बौद्ध साहित्यातील महावस्तु,ललितविस्तार,बुद्धचरित आणि निदानकथा यात हि कथा प्रसिद्ध आहे.यात थोडक्यात ते सांगतात की राजकुमार सिद्धार्थ याने गृहत्याग केल्या नंतर त्याच्या जवळ असलेल्या तलवारीने आपले केस कापल्या नंतर ते तावतीम्सा स्वर्गात नेण्यात आले होते.तिथे देवांचा प्रमुख सक्क(इंद्र)याने ते स्वीकारून देवांच्या मंदिरात प्रतिष्ठित केले होते.
अश्वघोष यांनी त्यांच्या बुद्ध चरित्रात याबाबतीत पुढील पंक्ती लिहिल्या आहेत.
' कमळाच्या पाकळ्या सारखी गडद तलवार म्यान करत
त्याने केसांसह आपले अलंकृत शिरोभूषण कापले
आणि हवेत फेकले,त्याचे कापड मागे पडले ते चित्र असे दिसत होते की जनुकाय तो हंस तलावात फेकतो आहे.
जसे ते वर फेकले गेले तसे स्वर्गीय प्राण्यांनी ये पकडले व श्रद्धेने त्याची पूजा केली स्वर्गातील देवतांनी दैवी सन्मानासह आदरांजली वाहिली."
वरील शिल्पपट हे तेलंगणा राज्यातील फनीगिरी या ठिकाणी २००३ साली उत्खनन करताना भेटलेले असुन ते ईश्वाकु या सत्ताकाळातील आहेत.
हि कथा खालच्या पटला पासुन सुरु होते त्याला महाभिनिष्क्रमण म्हणुन संबोधिले जाते.ज्यामध्ये बोधिसत्व राजकुमार सिद्धार्थ रात्री त्याच्या राजवाड्यातून प्रस्थान करतोय, राजवाड्यातील दिवे विझविण्यात आलेले आहे तसेच वरच्या डावी बाजुकडील एक व्यक्ती मशाल हातात घेतलेला दिसतोय याचा अर्थ रात्रीच्या समयी राजकुमार सिद्धार्थाने गृहत्याग केलेला हे या शिल्पावरून जाणवते. राजकुमार सिद्धार्थ त्याच्या कंठक या आवडत्या घोड्यावर स्वार झालेला आहे तसेच त्याचा जवळचा सेवक चन्न(लांब अंगरखा घातलेला) हा देखील सोबत दिसत आहे.
शांतपणे निघून जाण्यासाठी घोड्याच्या खुरांना आधार देणारे आकाशीय प्राणी त्या ठिकाणी आले होते. एका सेवकाने वर छत्री धरली आहे आणि घोड्याच्या मागे दुसऱ्याने राजपुत्राची वस्त्र गुंडाळलेली तलवार धरली आहे.
दुसऱ्या पॅनल मध्ये राजकुमार सिद्धार्थ त्याचे सहकारी तसेच प्रजेसोबत जंगलात बसलेला दिसुन येतोय ,वरच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडाने ते सूचित केलेले आहे.राजकुमार प्रवज्जा घेणार असल्याने सर्व प्रजा चिंतीत दिसत आहे.राजकुमाराने गृहत्याग करू नये हे त्याला हात जोडुन विनवनी करताना प्रजा दिसत आहे. दागिने आणि ऐहिक वस्त्रे टाकून दिल्याने राजकुमार आता सामान्य व्यक्ती झालेला दिसत आहे.चंदाने आपल्या स्वामीचे पाय भक्तीच्या कृतीत धरलेले आहेत.तर त्याचा घोडा कंठक देखील त्याठिकाणी दिसतो आहे.त्याच्या सोबत असलेली त्याची प्रजा तसेच बाकीचे तपस्वी हे राजकुमार सिद्धार्थ गौतमाला परीव्राराजकाचे कपडे देण्यासाठी तयार असल्याचे दिसुन येते.
शेवटच्या तिसऱ्या पटला मध्ये राजकुमार सिद्धार्थाचा मुकुट हा सक्काने इंद्राने त्यांच्या दोन्ही हाताने डोक्यावरील एका सपाट पात्रात धरल्याचे दिसत आहे.इंद्राच्या बाजूला असलेल्या देवांनी सुद्धा त्याला आधार दिला आहे.तिस्ता स्वर्गात त्याची पुजा करतानाचे हे दृश्य आहे.हा सर्व प्रसंग एक प्रकारे भगवंताच्या पगडी मध्येच कोरलेला दिसुन येतोय.
चित्र क्रमांक दोनच्या पॅनल मध्ये आपल्याला धममिलीपितील एक शिलालेख दिसुन येतोय त्याचे वाचन पुढील प्रमाणे सुधम देव सभा भगवतो चुडा महा
वेजयंतो पासादे
तसेच याठिकाणी बुद्धांचा मुकुट ठेवलेला आहे त्यात त्यांचे केस देखील ठेवलेले असतात.या शिलालेखवरून फनीगिरी येथील शिलालेखाचा प्रसंग हा नक्कीच देवसभेतील असल्याचा आपल्याला अनुमान लावता येतो.
या शिल्पपटात देवसभा दिसुन येते तसेच चार अप्सरा देखील यात आपल्याला दिसत आहेत.
सिद्धार्थ कसबे
Comments
Post a Comment