बौध्द लेणी
भारतामधील एकूण लेण्यांची संख्या पाहता त्यापैकी अंदाजे 80 टक्के लेणी महाराष्ट्रात आहेत. या लेनिंचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धार्मिक वास्तू आहेत. विविध धर्मांच्या आश्रयदात्यांनी त्या कोरण्यासाठी सढळ हातांनी दानधर्म केला होता. हे त्या लेंनींमधील शिलालेखा वरून समजते. त्यामध्ये सर्वात जास्त लेणी बौद्ध धर्मियांसाठी केलेल्या आहेत. त्यामध्ये चैत्यगृह अर्थात प्रार्थनास्थळ आणि विहार अर्थात राहण्यासाठी खोल्या यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील अग्निजन्य खहक हा अशा प्रकारच्या कोरीव कामासाठी अनुकूल होता. त्यामुळे भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लेनीं चे प्रमाण अधिक दिसते.
महाराष्ट्रातील या गुहा सर्वसाधरणपणे प्राचीन व्यापारी मार्गावर किंवा त्यांना जोडणार्या छोट्या रस्त्यांजवळ तसेच एखाद्या मोठ्या व्यापारी केंद्राजवळ कोरल्या गेल्या होत्या, असे दिसते. या गुहांमध्ये मोठ्या संख्येने त्या काळात रूढ असलेल्या ब्राह्मी लिपीमध्ये, प्राकृत आणि पाली भाषामध्ये शिलालेख आढळून येतात. ते मुख्यत: दानलेख या स्वरूपाचे आहेत. त्यावरून या लेणी खोदण्यासाठी व्यापारी तसेच विविध कारगीर यांनी दाने दिली होती हे लक्षात येते. निरनिराळी राजघराणी तसेच त्यांचे अधिकारीही यामध्ये आघाडीवर होते, हे या लेखांमधून समजते. काही लेनींमध्ये भिक्षू आणि भिक्षुणी यांनी दिलेल्या दानांचे उल्लेख असलेले शिलालेख दिसून येतात.
महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांमध्ये तीन ठळक प्रकार दिसून येतात. 1. चैत्यगृह, 2. विहार 3. बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या मूर्ति असलेल्या लेणी येथे आढळतात.
जेव्हा अशा प्रकारचे स्थापत्य दगडातून निर्माण झाले. तेव्हा त्याला अशा डागडुजीची गरज नाही हे लक्षात आले. दगडात लेणी कोरण्यासाठी योग्य असे दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे अशा लेणी येथे जास्त आहे.
अशा प्रकारची चैत्यगृहे आणि विहार हे बांधीव स्वरूपात उरलेल्या देशभरात निर्माण झाले होते. इ.स. पूर्व 5 व्या शतकापासून अशा प्रकारच्या विहारांची निर्मिती भारतात झाली होती हे साहित्यातून, उत्खनित पुराव्यापासून स्पष्ट होते.
एकदा तरी या अनमोल भारतातील लेणी ला अवश्य भेट दया.
Siddharth
Great work done by you dear siddharth... please if possible to translate these information in hindi ...it will very helpful to understand it all others who don't read marathi language.
ReplyDeleteThanks ...