#सातवाहन #कालातील #जुन्नर #येथील #बौद्ध #लेणी चा अभ्यास करत असताणा मला आलेला अनुभव..
मी सिद्धार्थ कसबे आणि माझे पुणे येथील मित्र पंचशील सोनवने,अनिल जगताप,विलास माने दिनांक 13 मार्च 2016 रोजी रविवारी सकाळी ठीक 9 वाजता आमची भेट आळेफाटा या ठीकाणी झाली.आम्ही सर्वजन लेणीचे अध्ययण करण्यासाठी खुप उत्सुक होतो, आळेफाटा येथील जय शंकर या होटल मधे सकालची न्याहरी करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.नगर कल्याण महामार्गावरील ओतुर या मार्गे आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत लेन्याद्रि येथील लेणी समूहाचा अभ्यास करण्यासाठी सकाळी ठीक अकरा वाजता लेन्याद्रि येथे पोहचलो.
जुन्नर तालुक्यात सातवाहन राजानी सुमारे 2200 वर्षा पूर्वी सह्याद्रीच्या डोंगरा मधे बौद्द भिक्षु साठी लेणी कोरुण ठेवल्या. त्यापैकी लेन्याद्रि लेणी हा एक समुह.
जुन्नर शहरापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर गोळेगाव येथे या लेणी आहेत.आम्ही सर्वांनी लेणी चा अध्ययण करण्यासाठी डोंगर चढायला सुरूवात केलि,
डोंगराच्या पायथ्या जवळ भारतीय पुरातत्व खात्याने लेणी च्या माहिती बद्दल कोणशीला लावली आहे,ती वाचुण आम्ही वरती चढ़ायला सुरुवात केली,डोळ्या समोर कोरीव लेन्या आम्हाला खुणावत होत्या,लेणी च्या पाहिर्या चढत असताना आम्हाला खुप माकडे दिसली,त्या माकडानचे हावभाव पाहुन मनामधे विचार येउन गेला की आपणही पूर्वी माकडच होतो,तसेच पायथ्याशी असणार्या कोणशिल वरील लेखात कपिचित डोंगर म्हणून हे ठिकान सातवाहन काला पासुन प्रचलित आहे(कपिचित म्हणजे माकड)आम्ही लेणी जवळ पोहचलो आणि लेणी चे कोरीव काम पाहुण थक्क जालो,लेणी द्वारातुन आतमधे भव्य स्तूप आहे,स्तुपाच्या द्वाराच्या वर ब्राम्ही लिपि मधे एक लेख कोरला आहे,त्यामधे कल्याण येथील सोनाराच्या मुलाने या लेणीसाठी दान दिल्याचा उलेख आहे हे वाचुन आम्ही स्तुपा जवळ गेलो,महाराष्ट्रातील एक सुंदर कोरीव स्तुप अशी ख्याती या स्तुपाची आहे.आकाश हे अर्ध सत्य आहे आणी पृथ्वी हे एक अर्ध सत्य दोन्ही मिळून जे पूर्ण सत्य निर्माण होते ते स्तुपाच्या माध्यमातून हिनयान लोकांणी आपल्या समोर कोरुन ठेवले आहे,स्तुपा समोर अष्टकोणी खांब असुन त्या वर सिंह आणि हत्ती यांची शिल्पे कोरलेली दिसतात.तसेच भगवान बुद्धांच्या महापरीनिर्वाणा नंतर पवित्र बुद्ध अस्थिवर सम्राट अशोकाने भारतामधे 84000 स्तुपांची निर्मीती केली आणि बौद्ध भीक्षु आणि उपासक या स्तुपांची पुजा करू लागले त्या पैकी लेन्याद्री मधील हा एक स्तुप. (वंदामी चेतियं सब्ब)त्या नंतर बाजूला एका भव्य आशा सभागृहात आम्ही प्रवेश केला एवढा मोठा सभागृह पाहुन मन थक्क जाले यामधे आम्हाला 20 शुन्यागर दिसले(शुन्यागर म्हणजे एका व्यक्ति साठी ध्याना साठी कोरलेली खोली)समोरच्या भिंती मधे जे शुन्यगार आहेत त्यातील दोन खोल्या तोडुन 8 व्या शतकात गणपतीची स्थापना करण्यात आली हिन्दु धर्मातील अष्टविनायका मधील एक गणपति म्हणुन हे संपूर्ण महाराष्ट्रा मधे प्रसिद्ध आहे।।या सभाग्रहा मधे त्याकाळी जे अरहंत भिक्षु होते त्यांची प्रवचने ऐकण्या साठी खुप मोठ्या प्रमाणात धम्म उपासक,राजे उपस्थित राहत,त्यांच्या सुमधुर धम्म वणिने हा परिसर मंगलमय वातावरणा मधे परिवर्तित होत असेल याची परिचिति मणामधे निर्माण जाली.
लेन्यद्रिचा निरोप घेउण पुढील अभ्यासासाठी , सातवाहन कालीन नानेघाटा कड़े भरधाव वेगाने आमची कार जुन्नरच्या दिशेने सुरु जाली,समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थान शिवनेरी किल्ला आमच्या दृष्टिस आला.शिवनेरी ला पाठी टाकत
आमची कार नानेघाटा कड़े धाव घेत होती.माजे मित्र नानेघाटा कड़े प्रथमच चालले होते,त्यामुळे त्यांच्या मनात त्याबद्दल कुतूहल निर्माण जाले होते.
आम्ही नानेघाटा जवळ पोहचलो होतो,नानाचा अंगठा आम्हाला सातवाहन कालीन जीवनाकडे घेउन गेला.
विश्वातील एकमेव राजे ज्यांनी सलग 450 वर्ष शांती पुर्व राज्य केले. जुन्नर ही सातवाहनांची राजधानी, प्राचीन कल्याण ते पैठण हा त्यावेळचा दळण वळणाचा मार्ग,या मार्गावर नानेघाट येतो,तिथे आम्हाला एक मोठा दगडी रांजण दिसला त्या मधे त्यवेळेस कल्याण बंदरा वरुण येणारा माल हा नानेघाटाच्या पायथ्या वरुण घोड़े,खेचरा मार्फ़त वरती नेत असत. तिथे विसाव्या साठी सातवाहन राजांनी लेणी कोरलेल्या आहेत.लेणी मधे सातवाहनांचे शील़ालेख कोरलेले दिसतात, काही शिलालेख हे अर्धवट अवस्थेत आहेत.मालाची जी वाहतुक होत असे त्याचा महसुल कर नाने रुपाने दगडी ऱाजनात जमा होत असे, एका दिवसात तो राणजन नान्यानी भरत असे,त्या मुळे त्याला नाने घाट असे नाव पडले असावे. निसर्गाने नटलेला नानेघाट आणि सातवाहन राजांचे उपकार मनात ठेउन आम्ही सर्व जुन्नरच्या दिशेने निघालो.
जुन्नर मधे आल्या नंतर आम्ही एका होटेल मधे जेवन केले,जवळच खानापुर च्या अम्बा अम्बिका लेणी गटातील भीमाशंकर लेणी पाहन्याचे आम्ही ठरवले,
लेणी च्या पायथ्याला कार पार्क करून आम्ही लेणी कड़े जायला सुरुवात केली, लेनिकड़े जायला जंगलातून जावे लागते, लेणी मार्ग खुप कठीन आहे.
पुरातत्व खात्याने कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नाही.जंगलातून वाट काढत आम्ही लेणी जवळ पोहचलो, लेणी च्या वर आम्हाला मोठी मध माशांची पोळि दिसली ते पाहून आम्ही खबरदारी म्हनून कोणीही बोलायच नाही,फोटो काढायचे नाहीत असे ठरवले कारण मागील वर्षी एका पोर्निमेला माजे जुन्नर तालुक्यातील मित्र यांच्यावर येथील मधमाशंनि हल्ला चढवला होता. आम्ही लेणी द्वारातुन आतमधे शांत पणे प्रवेश केला,समोरच आम्हाला स्तुपा मधे अर्धवट बुद्धांची मूर्ति कोरलेली दिसली ते पाहून आमच्या मना मधे प्रश्न आला की या अर्धवट शिल्पा मागे काय कारण असावे, सम्राट अशोकाचा नातु ब्रहदत याची पुष्यमित्र श्रुन्गाने जी कपटाने हत्या केलि आणि त्या नंतर बुद्ध धम्माचा जो प़ाडाव सुरु जाला त्या कारनाने हे शिल्प अर्धवट राहिले असेल कदाचित असे समजुन आम्ही लवकर ख़ाली यायला निघालो,
खाली येत असताना अचानक मागील बाजूने मध माशानी आमच्या वर हल्ला केला, मी सहकार्याणा अगोदर सुचना दिली होती क़ी जर मश्यानी हल्ला केला तर जमिनीवर ज़ोपावे,त्या मुळे आम्ही सर्वजण जमिनीवर जोपलो,परन्तु खुप सार्या माश्यानी आमच्या वर हल्ला केला होता त्या मुळे आम्ही ठरवले की तेथून पलायचे,आम्ही जसे पळयाला लागलो आमच्या मागे सर्व माशा येउ लागल्या आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला.कोण कुठे आहे हे आम्हाला कोणालाच माहित नवते,प्रत्येक जण आपला जीव मुठित धरून पळत होता. आम्ही क़ार जिथे पार्क केलेली तिथे आलो माशा चावतच होत्या,मी कार च्या खाली जाउण जोपलो माशा खाली येउन चावत होत्या मी खुप घाबरलो होतो,बाजूने मला अनिल जगताप जाताना दिसले.माज्या मनात पंचशील सोनावनेंचा विचार आला,कारण ते जास्त पलू शकत नवते.त्यांना वाचव न्यासाठी मी रोड च्या बाजूला जी घरे होती तेथील लोकांना मदती साठी विनवणी करत होतो परंतु कोणीही माज्या जवळ यायला तयार नवते कारण माशा मला चावत होत्या.मी ठरवले की जुन्नर गावात जाऊन मदत मागाव़ी माश्या खुप चाव्ल्या होत्या परन्तु तशाही अव्स्तेत जुन्नरच्या सरकारी दवाखान्यात गेलो तिथे पहिलेच जगताप पोहचले होते आम्ही नर्स मार्फत पंचशील सोनवने आणि विलास माने हे दोघे अजुन आले नाहीत,नर्स ने पोलिसांना फोन करुण माहिती दिली आम्हाला एडमिट करण्यात आले होते सम्पूर्ण शरीर मध माशांच्या काट्यान्नी भरले होते खुप वेदना होत्या..तेवढ्यात पंचशील सर आल्याचे आमच्या मित्रांनी सांगितले त्यांची हालत खुप नाजुक होती मध माशांचे डंख सम्पूर्ण शरीरावर होते त्यांच्यावर त्वरित
उपचार सुरु करण्यात आले,पोलिसांनी त्यांच्या घरी फोन करुण कलवले होते त्याच रात्रि पंचशील सरांना त्यांच्या घरच्यांनी पुण्याला नेले.जगताप आणि माने सर ही पुण्याला गेले,पंचशील यांच्यावर १महिना उपचार करन्यात आले आणि आज सर्व जन सुखरूप आहेत...
लेणी म्हणजे काय हे लेणी पहायला गेल्या शिवाय समजत नाही.२५०० वर्षांपूर्वी भारतात शिल्प कला किती सर्वोच्च स्थिति मधे होती हे लेणी मधील शिल्प कला पाहिल्यावर आपल्याला समजते.
पुरातत्व खात्याने या आपल्या ऐतिहासिक वारसा असणार्या लेणी,गड़,किल्ले या वास्तु कड़े लक्ष्य दिले पाहिजे हिच एक अपेक्षा...
सम्पूर्ण माहिती,खबरदारी घेउन एकदा तरी जुन्नर मधील सातवाहन कालीन लेणी तसेच भारता मधील लेणिस एकदा तरी अवश्य भेट दया....
sands casino: $1600 welcome bonus & 10% match
ReplyDeletesands casino: $1600 welcome bonus & 10% 제왕카지노 match bonus. A deposit bonus of $1 샌즈카지노 is a 100% match bonus on your deccasino first deposit. $1600.