Skip to main content

तुळजा बुद्ध लेणी जुन्नर

तुळजा बुद्ध लेणी जुन्नर

सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुं वर 84000 स्तुप बांधले, लेणी कोरल्या.पहिली लेणी बिहार येथील बराबर येथे कोरली.जगप्रसिद्ध सांची,सारनाथ,भरहुत येथील स्तुप आपल्याला माहीत आहेत.सांची येथील बुद्ध स्तुपाचे चित्र आज नविन आलेल्या 200 च्या नोटेवर आपणास पहायला मिळते.

जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शहर. ज्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजुला कड़ेलोटाच्या पायथ्या जवळ एक टेकडी लागते त्या टेकडी पासुन जवळच ठाकरवाडी म्हणुन एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी कोरलेली आपणास पहायला मिळते.

भारतातील एकून लेन्यां पैकी  सर्वात जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्या पैकिच तुळजा लेणी.
तुळजा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरन्यात आलेली सर्वात पहिली लेणी असावी . ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.

या लेणी मधे असलेला स्तुप हा अन्य ठिकाणी पहायला मिळत नाही.या स्तुपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट. बाजुलाच बौद्ध भिक्षु साठी विहार,भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते.यात उपासक स्तुपाची पुजा करताना दाखवले आहेत. बुद्ध,धम्म,संघ या तिन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्ध जुन्नर येथील प्रत्येक लेणी मधे कोरलेले दिसते. डोंगरावरुन कोसळनारे धबधब्याचे पानी थेट लेणी समोरच पानकोदी मधे साठवले जाते.पावसाळ्या मधे लेणीचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसते.लेणी मधुन समोर असलेला विस्तीर्ण जुन्नर तालुका,शिवनेरी किल्ला दिसतो.
या लेणीच्या अभ्यासासाठी अनेक अभ्यासक येत असतात. लेणी आणि शिल्प कलेचे अभ्यासक महेंद्र शेगावकर सर या लेणी बद्दल सांगतात की
ह्या लेणीच्या निर्मितीचा काळ हा सुरवातीचा म्हणजे इ, स,पु. 230 चा आहे , नंतर तिथे अजिंठ्या सारखे चित्रकलेच्या माध्यमतून जातककथा व बुध्द चरित्रातील प्रसंग साकारण्यात आली .
या लेणीची प्रसिध्दी हेन्री कुझेन च्या कानावर गेली , मुंबई गव्हर्नर व तो या लेणी पहान्यासाठी येणार होते असा निरोप जून्नरच्या कलेक्टर ला मिळाला .
गव्हर्नर येतात म्हणून लेणीची साफसफाई करुन घेण्यात आली .वाढलेली झुडपे ,कोळी किष्टके , पाकोळ्याची घाण ,काढण्यात आली . ही घटना 1918 मधील आहे .
पाणी टाकुन गोणपाट - कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या .
त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली .
जेव्हा गव्हर्नर, हेन्री कुझेन आले ...बघतात तर काय ? तो हा प्रकार ... जे पाहण्यसाठी आले तेच नष्ट झालेले होते . अतिऊत्साह व अज्ञाना पायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता.
झालेल्या प्रकारामुळे त्यांनी कपाळावर हात मारुन घेतला.
या बाबतचा तेंव्हाचा अहवाल आजही पुरातत्व खात्याकडे आहे .
अज्ञाना पायी असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत .
16/17 व्या शतकात सारनाथ येथील तथागताँच्या अस्थीचा सोन्याचा करंडक सापडला त्यातील रक्षा गंगेत श्रध्दापुर्वक विसर्जीत करण्यात आली व तो करंडक जपुन ठेवण्यात आला .
तुळजा लेणी स्तुप व त्यावर असलेले गोल छत्र व बारा गोलाकार स्तंभ अशी रचना अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.
आपन शिवनेरी किल्ला बघण्यासाठी कधी जुन्नर ला आलाच तर जवळच असलेल्या या ऐतिहासिक तुळजा बुद्ध लेणीला अवश्य भेट दया.

Comments

Popular posts from this blog

शिवनेरी बुद्ध लेणी

शिवनेरी किल्ल्यावरील बुद्ध लेणी छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा. पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात. आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या लेणीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातुन शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खुप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात.लेणी वर जाण्यासाठी खाली साखळदंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत.साधारणता १ तासाची चढाई केल्यावर आपण साखळदंड आहे त्याठीकाणी येउन पोहचतो. त्या इथे एक मोठा लेणी समुह आपल्याला पहायला मिळतो. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याच प्रमाने या लेणीच्या समोरच पाण्याची टाकी आहे.उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यां मधे मुबलक प्रमाणात पाणी ...

Kanheri Buddhist caves

कान्हेरी लेणी अभ्यास दौरा. ************************ बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्ध कालीन इतीहासची आठवण करुण देणारे  जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी. सम्राट अशोकांचे ...

सातवाहन कालीन नानेघाट

दोन हजार वर्षां पुर्वीचा सातवाहन कालीन कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावरील नानेघाट महाराष्ट्रातील ऐतिहासिक दृष्टया संपन्न असलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक...