दुर्ग भ्रमंती किल्ले हडसर
जुन्नर तालुका हा छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणुन जगप्रसिद्ध आहे.ज्या शिवनेरी किल्ल्यावर राजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्याला अनेक पर्यटक भेट देत असतात.
आम्ही जुन्नर मधील पर्यटकांच्या गर्दीपासुन दुर असलेला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेला आणि अतिसुंदर स्थापत्य कलेचा नमुना असलेला किल्ले हडसर ला भेट द्यायचे ठरवले.
ठरल्या प्रमाने मी आणि माझे मित्र डॉ.संदीप रोहकले,निखिल बारभाई, स्वप्निल काकडे यांना कळवले,या हडसर किल्ले मोहिमेसाठी यावेळेस आमच्या सोबत ७६ वर्षांचे डॉ.कोठाडिया सर उपस्थित होते.
हडसर किल्ला हा मध्यम श्रेणी मधे येतो.
शिवनेरी किल्ल्या पासुन हडसर किल्ला साधारणता १५ किलोमीटर अंतरावर आहे,
या किल्ल्याच्या पायथ्यालाच हडसर हे गाव आहे या गावावरुनच किल्याला हडसर हे नाव दिले गेले असले पाहिजे.
आम्ही हडसर गावाजवळ दुपारी १च्या सुमारास पोहचलो.थंडीचे दिवस चालु असल्या कारणाने सुर्य आमच्या वर थोड़ा खुश होता. हडसर चे अप्रतिम सौंदर्य पाहुन सर्वांना आनंद झालेला आणि कधी आपण किल्ल्यावर जाऊ असे सर्वांना वाटत होते.किल्ला चढायला आम्ही सुरुवात केलि.
आमच्या सोबत असलेले डॉ.कोठाडीया हे आमच्या ग्रुप मधे सर्वात वयोवृद्ध असुनही पंचविशीतल्या तरुणाला लाजवेल या गतीने मार्गक्रमन करत होते.डॉ. रोहकले हे आम्हाला हडसर किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देत होते.सोबत असलेले सर्व जण जुन्नरच्या 7वैभवशाली इतिहासा मधे हरवुन गेला होता.
किल्ल्याच्या मध्यावर आल्यावर डोंगरामधे कोरलेली एक पाण्याची टाकी आम्हास दिसली,सर्वांनी त्या टाकीतील अमृता समान पाण्याने आपली तहान भागवली आणि थोड़ा आलेला थकवा दुर केला.
समोरच मानिकडोह या जलाशयाचे विस्तीर्ण असे पाणी नजरेस पड़ते आणि मन प्रफुल्लित होउन जाते.जेव्हा शिवाजी महराजांनी सुरतेवर स्वारी केलि आणि तेथील खजिना आपल्या सोबत आणला त्यातील काही हीरे, मानके येथील एका डोहा मधे ठेवले होते यावरुन त्या गावाला आणि जलाशयाला मानिकडोह असे नाव पडले हे तेथील स्थानिक लोक सांगतात.
मानिकडोह धरणाचे आणि समोर दिसणार्या सह्याद्रीचे,निसर्गाचे विलोभनीय रूप पाहुन आम्ही पुढे वाटचाल केलि आणि दगडाने रचलेल्या पायर्यां जवळ येउन पोहचलो.स्वप्निल काकडे आणि निखिल बारभाई हे आम्ही तिघांनी सोबत केलेल्या अनेक दुर्ग भ्रमंतीच्या आठवणी सर्वांना सांगत होते.
दगडा च्या पायऱ्या आणि त्याच्या सरळ वर किल्ल्याचा बुरुजाची भींत नजरेस पडते. पायऱ्या संपल्यावर डावीकडे वळन घेतल्यावर अखंड काताळा मधे कोरलेला दरवाजा आणि पायऱ्या दिसतात. या दरवाजाची रचनाच या प्रमाने केली आहे की शत्रुच्या तोफांचा मारा हा दरवाजा वर येउ शकत नाही आणि जवळ आल्या शिवाय दरवाजा नजरेस पडत नाही.
हडसर किल्ला हा सातवाहन राजांच्या काळातील आहे हे त्याचे कोरीव काम पाहुन समजते.
दोन हजार वर्षांपुर्वीच्या कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्ग़ा वरील नानेघाटाच्या संरक्षनार्थ सातवाहन राजांची राजधानी असलेल्या जुन्नर मधे अनेक किल्ले उभारले गेले त्या पैकिच हा हडसर किल्ला पुढे मुघल आणि मराठे शाहिच्या काळात या किल्ल्याचा वापर हा शिवनेरी किल्ल्याच्या संरक्षनासाठी केला गेला.
आम्ही काताळात कोरलेल्या पायर्या आणि दोन सुरेख कोरीव काम केलेल्या दरवाजा मधुन पुढे गेलो. गडावर असलेले धान्याचे कोठार हे त्याकाळी गडावर किती विपुल प्रमाणात माणसांचा वावर असेल याची साक्ष देत आजही दिमाखात उभे आहे.
समोरच एक मोठा तलाव दिसला त्यात स्थानिक लोकांची गुरे होती.आणि या तलावाच्या समोरच शंकराचे मंदिर आहे या मंदिराचे माझ्या सोबत आलेल्या सर्वांनी दर्शन घेतले आणि आंम्ही पुढे खिळ्याची वाट पाहण्यासाठी वाटचाल केली, गवताचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात असल्या कारनाने पायवाट गडप झालेली,तसेच गवतातुन मार्ग काढत आम्ही सर्व पुढे चालत होतो. मधेच आम्हाला एक लेणी सदृश खोली कोरलेली दिसली ती पाहुन आम्ही हडसर किल्ल्याच्या मागील बाजुस पोहचलो.एक मोठी संरक्षक भींत वजा बुरुंज बांधलेला दिसतो
या ठिकानाहुन किल्ले शिवनेरी, सिंदोळा,गणेश खिंड,पिंपळगाव जोगे धरण,मालशेज घाट, हरिश्चन्द्र गढ़, आणि सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा पसरलेल्या दिसतात.
इथे बसुन आम्ही सर्वांनी पोटपुजा करून आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केलि
सुर्य मावळतीला आला होता मावळत्या सुर्याचे मानिकडोह धरन आणि सह्याद्री सोबतचे रुप पाहुन आपण कुठे तरी स्वर्गातच आहोत असा भास् झाला आणि हे सर्व डोळ्या मधे साठवुन आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केलि.
मध्या पर्यंत आलो आणि अंधार पडु लागला होता.जवळचा मार्गाने उतरावे असे आम्ही ठरवले आणि आलो त्या मार्गाने न उतरता दुसर्या मार्गाने उतरायचे ठरवले. आमच्या सोबतीतील स्वप्निल आणि खिल्लारी यांना आमची कार ज्या ठिकाणी लावली होती तिकडे पहिले पाठवले आणि आम्ही दुसर्या मार्गाने उतरु लागलो.
जंगलाची शांतता अनुभवत आम्ही खाली उतरत होतो, रातकीड्यांच्या आवाजाने जंगला मधे एक वेगळाच थरार वाटत होता.
आम्ही सर्वजन त्या अंधाऱ्या जंगलातुन आमच्या कड़े असणाऱ्या विजेरी आणि मोबाइल च्या प्रकाशा मधे वाट काढत खाली येत होतो
सोबत असलेले कोठाडीया यांना उतरताना त्रास होइल असे वाटत होते पण त्यांना निखिल आणि डॉ.रोहकले यांनी जो आधार दिला त्यामुळे सरांना कोणताही त्रास किंवा थकवा जाणवला नाही आणि आमचा खाली उतरन्याचा प्रवास त्या जंगलाच्या काळोखातुन चालुच होता.
आमची कार आणन्यासाठी जे दोघे खाली गेले होते ते आमची वाट पाहत डुंबरवाडी येथे आले पण आम्ही लवकर खाली न आल्या कारणाने त्यानी तेथील एका स्थानिकाला सोबत घेउन आमच्या कड़े येत होते.
आम्ही पण खाली उतरलोच होतो व आमची भेट झाली.हडसर किल्ल्याचा चित्तथरारक अनुभवाची आता सांगता होणार होती.किल्ले हडसरचे चंद्राच्या मंद प्रकाशा मधील देखने रूप आम्ही सर्वांनी आपआपल्या डोळ्या मधे साठवले आणि घरी परतीच्या प्रवासाला सुरुवात केलि.
किल्ले हडसर चे मनमोहक रूप पहायचे असेल तर एकदा तरी हडसर ला भेट दया.
७६व्या वर्षातही अवघड असा हडसर किल्ला सर करणारे डॉ.कोठाडिया यांच्या धैऱ्याला सलाम.
आमचे पुणे येथील मित्र रविदादा पवार, गौरव कांबळे आणि जयदिप इनामदार हे महाराष्ट्रातील किल्ले तसेच गड कोटांच्या संवर्धन आणि स्वच्छतेचे कार्य करत आहेत त्यांच्या कार्यास सलाम.
लेणी,गडकोट आणि किल्ले हा आपला अमुल्य असा ऐतिहासिक वारसा आणि खजिना आहे तो जतन करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याला जमेल त्या मार्गे त्यांचे संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.
Comments
Post a Comment