शिवनेरी किल्ल्या जवळ असलेली लेन्याद्रि बुद्ध लेणी,जुन्नर.
जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेला आहे व याच डोंगर रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत अग्निज्न्य खडकात सातवाहन राजे, व्यापारी,उपासक यांनी बौद्ध भिक्खुं साठी अनेक लेणी कोरलेल्या होत्या.बौद्ध भीक्खुं च्या निवासा साठी विहारे, प्रार्थने साठी चैत्य गृह, ध्यान धारणे साठी शुन्यागार यांची निर्मिती या लेन्यां मधे केलि गेली.
संपूर्ण देशांत शैलगृहांमध्ये जुन्नर तालुक्यातील लेणी समुह सर्वात मोठा असून येथील शैलगृहांची संख्या जवळपास 450 इतकी आहे. येथील जवळपास सर्व बौद्ध लेणी हीनयान(थेरवाद)परंपरेतील आहेत.हीनयान हा पंथ बुद्ध प्रतीकांची पुजा करत असत, सिरिपाद सरोरुहे,बोधिवृक्ष,स्तुप ही बुद्ध प्रतिके होत.पुढे सम्राट कनिष्का च्या काळात बुद्ध मुर्ति निर्माण झाल्या नंतर महायान बौद्ध पंथिय लोकांनी लेन्यां मधे बुद्ध मुर्ति कोरन्यास सुरुवात केली. हिनयान आणि महायान लोकांचा मिलाप आपल्याला पुढे स्तुपां मधे कोरलेल्या बुद्ध मुर्ति वरुन लक्षात येतो. स्तुपां मधे बुद्ध मुर्ति आपणास कान्हेरी,वेरुळ,अजंठा या सारख्या लेन्यां मधे बघण्यास मिळतात.
शैलगृहांची निर्मिती इ.स.पुर्व 1ल्या ते 3र्या शतकात झाली. जुन्नर तालुक्यातील लेणी समुह त्यांच्या निर्मिती व स्थानानुसार वेगवेगळ्या भागात व गटात विभागलेले आहेत. जसे की तुळजा लेणी, मानमोडी, भिमाशंकर,अंबा अंबिका, भुतलेणी,शिवनेरी,गणेश, चावंड, जीवधन,नाणेघाट,हडसर,निमगीरी,खिरेश्वरलेणी या गटात विभागलेल्या आहेत.
लेन्याद्रि लेणी च्या स्तुप असलेल्या लेनी प्रवेश द्वारा वरील शिलालेखात ‘कपिचित’ मनाने शांत असलेले ठिकान अशा उल्लेखलेल्या लेण्याद्री गटाला ‘गणेश पहाड’ व सुलेमान डोंगर अशी नावे असून हा एक प्रमुख वेगळाच गट आहे. या ठिकाणी 40 शैलगृह असून मुख्य 30 शैलगृह पुर्व-पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्र. 6 व 14 हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.या पैकी गुंफा क्र.7 हा सर्वात मोठा प्रशस्त विहार आहे. बाकिच्या इतर लेणी विहार असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे. गुफा क्र. 6 हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तुप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.सन 2 र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे. गुंफा क्र. 7 ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा विहार आहे. विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे 20 निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायर्यांचा जीन आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो. गुंफा क्र.14 ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैतगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या बौद्ध उपासकाने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स 2 रे शतक आहे.
या लेणी मधे परीपूर्ण असलेला जो स्तुप आहे त्या लेणी च्या छतावर दगडी कमानी चे कोरीव काम केलेले दिसते या प्रकारचे काम हे भाजे लेणी मधे केलेले आहे परंतु ते लाकडा मधे कोरलेले आहे तसेच या स्तुपा भोवती जे खांब आहेत आणि सभामंडपाच्या समोर जे खांब आहेत त्या खांबां वर सिंह आणि हत्ती यांची शिल्पे कोरलेली आहेत. सिंह आणि हत्ती ला बौद्ध धम्मात खुप महत्वाचे स्थान आहे. सिंहा ला पाली भाषेत शाक्य आणि हत्ती ला पाली भाषेत मातंग संबोधतात. सम्राट अशोकां नि त्यांच्या स्तंभा वर चार सिंह कोरलेले आपणास माहितच आहे आणि प्रजासत्ताक भारताने हिच सम्राट अशोकाची मुद्रा भारतीय राज मुद्रा म्हणुन स्विकारलेली आहे.
असा हा भारताचा ऐतिहासिक वारसा असलेली जुन्नर तालुक्यातील लेन्याद्रि लेणी आपणास दोन हजार वर्षां पुर्वीच्या कालखंडात घेउन जाते आणि भारतीय शिल्प कला ही किती प्रगत होती हे या लेणी पाहिल्या वर आपणास समजते.
सिद्धार्थ कसबे
7757891409
joya shoes 890t1vfzmn475 afslappet,STØVLER,STÖVLAR,csizma,botas,gewoontjes,camminando,mode baskets,gehen,stiefel joya shoes 998p6bhark524
ReplyDelete