Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

बुद्ध स्तुपा पॅनेल,नागर्जुनकोंडा,गुंटूर जिल्हा,आंध्रप्रदेश.

 बुद्ध स्तुपा पॅनेल,नागर्जुनकोंडा,गुंटूर जिल्हा,आंध्रप्रदेश. नागर्जुन कोंडा येथील महाचैत्याच्या सभोवती या प्रकारचे बुद्ध प्रसंग सांगणारे पॅनल लावण्यात आलेले होते. या स्तुपाच्या खालच्या भागात आपल्याला दोन स्तंभ दिसत असुन त्यावर धम्मचक्र कोरण्यात आलेले आहे.म्हणजेच ते धम्मचक्र स्तंभ असुन त्याच्या बाजूला सिंह कोरण्यात आलेले आहेत.ते स्तंभ प्रदक्षिणा मार्गाच्या इथे असावे त्याची पूजा करताना उपासक दिसत आहेत. मध्यभागी आपणास अभयमुद्रेतील बुद्ध दिसत असुन बुद्ध हे नागराजच्या वेटोळ्यावर बसलेले दिसत आहेत.अनेकदा बुद्ध हे आपल्याला सिंहासनावर बसलेले दिसतात याठिकाणी ते नागराजावर विराजमान आहेत. हा नागराज सात फन असलेला असुन बुद्धांच्या डोक्यावर त्याने ते फन धरलेले आहेत याचा अर्थ एक प्रकारे नागराज बुद्धांच रक्षण करतोय याठिकाणी बुद्धांच दाखवलेले प्रभावलय हे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्याचं द्योतक आहे.त्याच्या वरच्या चौकोनात बुद्धांना वंदन करताना काही साधुमुनी दाखवलेले आहेत.त्याच्या वर पाच स्तंभ दाखवलेले असुन मध्यभागी असलेल्या स्तंभाच्या वर एक लघु स्तुप कोरलेला असुन त्याच्यावर देखील सात फन अ...

Tree and Serpentइसवी सन पुर्व पहिल्या शतकातील कणगनहल्ली(कर्नाटक) येथील महाचैत्याच्या परिसरातील शिल्पपट.रामग्राम स्तूपाचे रक्षण करताना नाग.

Tree and Serpent इसवी सन पुर्व पहिल्या शतकातील कणगनहल्ली(कर्नाटक) येथील महाचैत्याच्या परिसरातील शिल्पपट. रामग्राम स्तूपाचे रक्षण करताना नाग. बुद्धांच्या महापरिनिर्वाना नंतर त्यांच्या शरीरधातुचे आठ भागात विभाजन करून त्यावर आठ स्तूपांची निर्मिती करण्यात आलेली होती.आठव्या भागाचा स्तुप हा राम ग्राम स्तुप म्हणुन ओळखला जातो.सम्राट अशोकाने सात स्तुपातील अस्थीधातु बाहेर काढुन त्यावर ८४००० स्तूपांची निर्मिती केली होती परंतु आठव्या भागातील स्तूपाच्या अस्थी देण्यास नागराजांनी विरोध केला होता आणि ते स्तूपाचे रक्षण करत होते. हीच कथा शिल्पांच्या रुपात आपल्याला या दक्षिण प्रदेशात पहायला मिळते. या शिल्पपटात जर आपण पाहिले तर  पाच फन असलेल्या दोन नागांनी स्तुपाला वेटोळे घातलेले आहे.ते दोन नागराज स्तूपाच्या आतील बुद्धांच्या अस्थीधातूंची पूजा तसेच रक्षण करत आहेत. या स्तूपाच्या हर्मिकेवर अनेक छत्रावली आपणास दिसत आहे.जनुकाय त्यांचा आकार हा आपल्याला पिंपळ वृक्षासारखा भासतोय.बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या पिंपळ वृक्षाचे ते प्रतिनिधीतत्व करतायेत.(जुन्नर व नाशिक येथील लेणी मध्ये देखील आपण...

बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

बुद्धांचा जन्म सुखकारक आहे. सदर शिल्पपटात राणी महामाया हि लुंबिनी वनात शाल वृक्षाच्या  खाली सिद्धार्थाला जन्म देताना आपल्याला दिसत आहे. राणी महामायेने शाल वृक्षाची फांदि हि आपल्या हातात धरलेली असुन ती फांदी अलगद वर गेल्याने प्रसुती कळा आल्या व तेथेच सिद्धार्थचा जन्म झाला.राणी महामायेच्या बाजुला कदाचित तिची बहीन राणी प्रजापती दिसत आहे जिच्या खांद्यावर राणी महामायेचा हात आहे तीने महामायेच्या पोटावर  हात फिरवला आहे.नवजात शिशुला वस्त्रात अलगद घेताना एक व्यक्ती दिसुन येतोय कदाचित तो इंद्र असावा.आकाशातील देव फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत. दोन हजार वर्षांपुर्वीच्या भारतातील गांधार शैलीतील हा शिल्पपट किती उत्तमरीत्या साकारलेला आहे हे आपणास  त्यात असणाऱ्या व्यक्तींनी परिधान केलेली वस्त्रे,त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य,त्यांची केशभूषा,महिला दर्शविताना त्यांच्या पायात असलेले कडे, गळ्यातील हार,कानातील आभूषणे सर्व काही अप्रतिम आहे.या अनामिक शिल्पकारांमुळेच बुद्ध जन्म,ज्ञानप्राप्ती ते महापरिनिर्वाण आपल्याला समजायला मदत होतेय. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग ज्या प्...

राजकुमार सिद्धार्थ चुडामहा पुजन,फनीगिरी,सुर्यापेठ जिल्हा तेलंगणा.गौतम बुद्धांच्या अवशेषां पैकी एक महत्वाचे अवशेष त्यांचा मुकुट व केस.

राजकुमार सिद्धार्थ चुडामहा पुजन,फनीगिरी,सुर्यापेठ जिल्हा तेलंगणा. गौतम बुद्धांच्या अवशेषां पैकी एक महत्वाचे अवशेष  त्यांचा मुकुट व केस. बौद्ध साहित्यातील महावस्तु,ललितविस्तार,बुद्धचरित आणि निदानकथा यात हि कथा प्रसिद्ध आहे.यात थोडक्यात ते सांगतात की राजकुमार सिद्धार्थ याने गृहत्याग केल्या नंतर त्याच्या जवळ असलेल्या तलवारीने आपले केस कापल्या नंतर ते तावतीम्सा स्वर्गात नेण्यात आले  होते.तिथे देवांचा प्रमुख सक्क(इंद्र)याने ते स्वीकारून देवांच्या मंदिरात प्रतिष्ठित केले होते. अश्वघोष यांनी त्यांच्या बुद्ध चरित्रात याबाबतीत पुढील पंक्ती लिहिल्या आहेत. ' कमळाच्या पाकळ्या सारखी गडद तलवार म्यान करत त्याने केसांसह आपले अलंकृत शिरोभूषण कापले आणि हवेत फेकले,त्याचे कापड मागे पडले ते चित्र असे दिसत होते की जनुकाय तो हंस तलावात फेकतो आहे. जसे ते वर फेकले गेले तसे स्वर्गीय प्राण्यांनी ये पकडले व श्रद्धेने त्याची पूजा केली स्वर्गातील देवतांनी दैवी सन्मानासह आदरांजली वाहिली." वरील शिल्पपट हे तेलंगणा राज्यातील फनीगिरी या ठिकाणी २००३ साली उत्खनन करताना भेटलेले असुन ते ईश्वाकु या सत्ता...

दक्षिणेतील बौद्ध धर्म.कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गाचा मी नेहमी उल्लेख करत असतो.नालासोपाऱ्या पासुन सुरु होणार हा दोन हजार वर्षांपूर्वीचा मार्ग आपल्या नाणेघाट-जुन्नर येथून पैठणला जातो पुढे तो दक्षिणेत कसा जातो व या दक्षिण भागात बौद्ध धर्म कशा प्रकारे प्रस्थापित झालेला होता.येथील बौद्ध मठ,स्तुप,शिल्पपट कोणत्या प्रकारचे होते हे आपण या पुढे पाहणार आहोत.दक्षिणापथा वरील बौद्ध धर्म.

१)रामग्राम स्तुप धुलिकट्टा स्तूप,करीमनगर जिल्हा, तेलंगणा. सातवाहन साम्राज्य,इसविसन पुर्व पहिले शतक. धुलिकट्टा स्तूपातील या  पॅनेलमध्ये दोन उपासक धर्मचक्राची  पूजा करताना दिसत आहेत.ते धर्मचक्र एका स्तंभावर आरोहित, हे दृश्य बुद्धाच्या भौतिक अवशेषांच्या (शरिराधातु) आठव्या भागाचे पूजन म्हणून देखील पाहता येईल. बुद्धाच्या महापरीनिर्वाणा नंतर लगेचच अस्थी धातूंच्या अवशेषांचे आठ भागात विभाजन करण्यात आलेले होते. हा भाग रामग्राम स्तूपामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला होता.   महापरिनिर्वाण-सूत्रानुसार संबंधित आख्यायिका सांगते की, नदीकाठच्या जवळ बांधलेला स्तूप नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला, तेव्हा ते अवशेष तेथे राहणाऱ्या नागांच्या ताब्यात आले. त्यांनी अवशेषाचा योग्य सन्मान केला आणि तो सम्राट अशोकाला आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. ही कथा आंध्रदेशाच्या सुरुवातीच्या शिल्पकलेत  मोठ्या प्रमाणावर चित्रित केली गेली आहे आणि अशोकवदनामध्ये, अशोकाच्या चरित्रात दुस-या शतकात लिहिलेली आहे. श्रीलंकेच्या राजाच्या वतीने हे अवशेष नागांकडून चोरले गेले आणि अनुराधापुरा येथील रुवानवली...