बुद्धांचा जन्म सुखकारक आहे.
सदर शिल्पपटात राणी महामाया हि लुंबिनी वनात शाल वृक्षाच्या खाली सिद्धार्थाला जन्म देताना आपल्याला दिसत आहे. राणी महामायेने शाल वृक्षाची फांदि हि आपल्या हातात धरलेली असुन ती फांदी अलगद वर गेल्याने प्रसुती कळा आल्या व तेथेच सिद्धार्थचा जन्म झाला.राणी महामायेच्या बाजुला कदाचित तिची बहीन राणी प्रजापती दिसत आहे जिच्या खांद्यावर राणी महामायेचा हात आहे तीने महामायेच्या पोटावर हात फिरवला आहे.नवजात शिशुला वस्त्रात अलगद घेताना एक व्यक्ती दिसुन येतोय कदाचित तो इंद्र असावा.आकाशातील देव फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
दोन हजार वर्षांपुर्वीच्या भारतातील गांधार शैलीतील हा शिल्पपट किती उत्तमरीत्या साकारलेला आहे हे आपणास त्यात असणाऱ्या व्यक्तींनी परिधान केलेली वस्त्रे,त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य,त्यांची केशभूषा,महिला दर्शविताना त्यांच्या पायात असलेले कडे, गळ्यातील हार,कानातील आभूषणे सर्व काही अप्रतिम आहे.या अनामिक शिल्पकारांमुळेच बुद्ध जन्म,ज्ञानप्राप्ती ते महापरिनिर्वाण आपल्याला समजायला मदत होतेय.
त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग ज्या प्रमाणे पाली साहित्यात मध्ये आपल्याला दिसतो तो प्रत्येक प्रसंग शिल्पांच्या माध्यमातून जिवंत करण्याची कला त्या कारागिरांच्या हातात होती.आजच्या जमान्यात ज्या प्रमाणे आपण आपले क्षण हे कॅमेऱ्यात टिपतो अगदी तसेच त्यावेळच्या कारागिरांनी ते क्षण भारतभूमीतल्या प्रत्येक दगडावर कोरलेले आहेत.
राणी महामायेचे स्वप्न शिल्प
हा शिल्पपट आपणास भगवान बुद्धांच्या जन्मपूर्वीची कथा सांगतो.राणी महामाया या पलंगावर पहुडलेली असुन एक श्वेत हत्ती तिच्या उजव्या बाजूला दर्शविण्यात आलेला आहे.
तसेच त्यावर भगवतो ऊक्रंती हि धम्मलिपीतील अक्षरे कोरण्यात आलेली आहेत.बाजुलाच शाल वृक्षाची फांदी हातात घेऊन राणी महामाया उभी असलेली दिसत आहे.
यातील भगवतो व ऊक्रंती हे शब्द खुप महत्वाचे आहेत.यात भगवान गौतम बुद्धांना त्याकाळात भगवतो या नावाने संबोधले जात असे आणि ऊक्रंती म्हणजेच एक प्रकारे उगम पावणे असा त्याचा अर्थ होतो.
जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment