Tree and Serpentइसवी सन पुर्व पहिल्या शतकातील कणगनहल्ली(कर्नाटक) येथील महाचैत्याच्या परिसरातील शिल्पपट.रामग्राम स्तूपाचे रक्षण करताना नाग.
Tree and Serpent इसवी सन पुर्व पहिल्या शतकातील कणगनहल्ली(कर्नाटक) येथील महाचैत्याच्या परिसरातील शिल्पपट. रामग्राम स्तूपाचे रक्षण करताना नाग. बुद्धांच्या महापरिनिर्वाना नंतर त्यांच्या शरीरधातुचे आठ भागात विभाजन करून त्यावर आठ स्तूपांची निर्मिती करण्यात आलेली होती.आठव्या भागाचा स्तुप हा राम ग्राम स्तुप म्हणुन ओळखला जातो.सम्राट अशोकाने सात स्तुपातील अस्थीधातु बाहेर काढुन त्यावर ८४००० स्तूपांची निर्मिती केली होती परंतु आठव्या भागातील स्तूपाच्या अस्थी देण्यास नागराजांनी विरोध केला होता आणि ते स्तूपाचे रक्षण करत होते. हीच कथा शिल्पांच्या रुपात आपल्याला या दक्षिण प्रदेशात पहायला मिळते. या शिल्पपटात जर आपण पाहिले तर पाच फन असलेल्या दोन नागांनी स्तुपाला वेटोळे घातलेले आहे.ते दोन नागराज स्तूपाच्या आतील बुद्धांच्या अस्थीधातूंची पूजा तसेच रक्षण करत आहेत. या स्तूपाच्या हर्मिकेवर अनेक छत्रावली आपणास दिसत आहे.जनुकाय त्यांचा आकार हा आपल्याला पिंपळ वृक्षासारखा भासतोय.बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या पिंपळ वृक्षाचे ते प्रतिनिधीतत्व करतायेत.(जुन्नर व नाशिक येथील लेणी मध्ये देखील आपण...